सायकल जनजागृती राईड
सामाजिक वनीकरण, वनविभाग नाशिक आणि Royal Riders यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहानिमित्त सायकल जनजागृती राईडचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीवांच े संरक्षण, पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आण ि निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्यासाठी जनजागृती करणे हा या राईडचा मुख्य उद्देश आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्य े सायकलिंग हा केवळ व्यायाम किंवा प्रवासाच े साधन न राहता आरोग्य, पर्यावरण आण ि सामाजिक जनजागृतीचा प्रभावी माध्यम बनला आहे. याच विचारातून वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने ही विशेष राईड आयोजित करण्यात आली आहे. राईडमध्ये सहभागी व्हा आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश सायकलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा!
About the ride — Free ₹1/-
दिनांक: बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ Assembly Point: CCF वनविभाग कार्यालय, त्र्यंबक नाका, नाशिक Assembly: सकाळी ६:१५ वा. Flag Off: सकाळी ६:३० वा. ॐ राईडचा मार्ग CCF वनविभाग कार्यालय, त्र्यंबक नाका मायको सर्कल ABB सर्कल भोसला मिलिटरी सर्कल कॅनडा कॉर्नर शरणपूर पोलीस चौकी CCF वनविभाग कार्यालय, त्र्यंबक नाका – राईड समाप्त सहभागी रायडर्ससाठी विशेष या जनजागृती राईडसाठी मर्यादित ५० रायडर्सचीच नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व ५० रायडर्सना विशेष टी-शर्ट देण्यात येईल. - राईड पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागी रायडर्ससाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चला, सायकलवरून जनजागृती करूया ! वन्यजीव हे आपल्या पर्यावरणीय साखळीचा अविभाज्य भाग आहेत. जंगल, वन्यजीव आण ि पर्यावरणाच े संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण स्वतः सायकल चालवूया... आणि इतरांनाही निसर्गाशी जोडूया !
Event schedule
| Day | Route | Distance | Time |
|---|---|---|---|
| बुधवार 7 ऑक्ट 2026 | CCF वनविभाग कार्यालय, त्र्यंबक नाका मायको सर्कल ABB सर्कल भोसला मिलिटरी सर्कल कॅनडा कॉर्नर शरणपूर पोलीस चौकी CCF वनविभाग कार्यालय, त्र्यंबक नाका - राईड | 20 | 06:15:00 |
Rules & regulations
- नावनोंदणी आवश्यक आहे.
- मर्यादित ५० जागा !
- नोंदणी साठी रॉयल आयडी असणे अनिवार्य
Our partners
वनविभाग महाराष्ट्र
Why participate?
नवीन वर्षाची नवी सुरुवात एक अप्रतिम राईड सोबत आणि वर्षभराचा सातत्यपूर्ण सायकलिंग चा संकल्प घेऊन
नवीन वर्षाची नवी सुरुवात एक अप्रतिम राईड सोबत आणि वर्षभराचा सातत्यपूर्ण सायकलिंग चा संकल्प घेऊन
वन्यजीव संरक्षणाची जनजागृती
वृक्ष व जंगलांचे महत्त्व
सायकलिंगचा प्रचार
आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश